
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारखेच मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळा च्या लाभार्तींना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्या – जळगाव अल्पसंख्यांक समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगाव _महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत उद्योग व व्यवसायासाठी दहा हजार पासून एक लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचे अध्यादेश जारी केले त्याबाबत जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजाने महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले व याच धर्तीवर मौलाना आझाद
अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जदारांना सुद्धा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी आर्त हात जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजाने अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या माध्यमाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.
*तीन मागण्याचे निवेदन*
१) मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना उद्योगासाठी बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून द्या
२) शैक्षणिक व इतर कर्ज जी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास मंडळातर्फे दिली जातात ती सुद्धा बिनव्याजी देण्यात यावी
३) कर्जासाठी ज्याप्रमाणे मराठा समाजातील तरुणांना फक्त आधार कार्ड, रहिवास पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र मागितले आहे त्याच धर्तीवर मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास मंडळाच्या लाभार्थी कडून तीच कागदपत्रे मागवण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.या निवेदनाची प्रत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या मंत्री महोदय तसेच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता अजित पवार यांना सुद्धा देण्यात आली आहे.
*निवेदन यांनी दिले*बौद्ध समाजातर्फे श्रीमती प्रतिभा शिरसाठ, मुस्लिम समाजातर्फे फारुक शेख अब्दुल्ला, जैन समाजातर्फे अजय राखेचा,पारशी समाजातर्फे देव दरबारी, सीख समाजातर्फे कमल अरोरा ,ख्रिश्चन समाजातर्फे प्रकाश आठवले यासह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मझर पठाण, एमआयएमचे अक्रम देशमुख व सिकलगर बिरादरीचे अन्वर खान यांची उपस्थिती होती.