प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात पाडवा पहाट संपन्न

भावेश ढाके

जळगाव  _शहरात दीपावली निमित्त प्रातःकालीन स्वरोत्सव साजरा करण्याची परंपरा स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाने सुमारे २० वर्षांपासून सुरू केली. या सर्वोत्सवाची सुचिर्भूतता, चैतन्य, मांगल्य, रेखीव रांगोळ्या, उपस्थितांचे मन प्रसन्न करते. कलावंतांनाही यापेक्षा जास्त काय हवे असते ? बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी महात्मा गांधी उद्यानाच्या कस्तुरबा रंगमंचावर मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने मैफल सजली. कलाकार होती चेन्नई येथील तरुण आश्वासक गायिका दीपिका वरदराजन. वरून नेवे यांच्या गुरुवानदानेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिपप्रजवलन कलाकार दीपिका वरदराजन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी प्रायोजक डॉ. राहुल महाजन , मेजर नानासाहेब वाणी व शहराच्या प्रथम नागरिक सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. कलावंतांचे सत्कार आदरणीय नानासाहेब वाणी, डॉ. विवेकानंद, प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. शरदचंद्र छापेकर, व डॉ. अपर्णा भट यांनी केले दीपिकाच्या मातोश्री गीता वरदराजन यया विशेष करून या मैफिलीस उपस्थित होत्या त्यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांनी केला कलावंताचा परिचय दीपक चांदोरकर यांनी केला आणि सुरू झाला एक सुरेल प्रवास.

दीपिकाने आपल्या मैफिलीची सुरवात राग ललत ने केली. विलंबित एकतालात निबद्ध “गुरू ही आये” तर छोटा ख्याल तीनतालात निबद्ध “भवंदा या नंदा जो बन”
“मोरा सैया बुलाई नदिया आधी रात” ही ठुमरी सादर केली. यानंतर दीपिकाने देस रागातील सं. मानापमान नाटकातील गोविंदराव टेम्बे यांनी संगीतबद्ध केलेले “शुरा मी वंदिले” हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर सं. सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीतबद्ध करून पं. प्रभाकर कारेकर यांनी गाऊन अजरामर केलेले ” प्रिये पहा, रात्रीचा समय सरूनी” हे नाट्यपद सादर केले. पं. भीमसेन जोशींनी अजरामर केलेले ” माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तीरी” हे भक्तीगीत सादर केले. यानंतर सं. मत्स्यगंधा नाटकातील”देवा घरचे ज्ञात कुणाला” हे नाट्यपद सादर केले. “तिन्ही सांजा सख्या मिळाल्या” भय इथले संपत नाही” यानंतर दीपक चांदोरकर यांनी आभार प्रदर्शन केली. “रसमे उलफत को निभाये कैसे” या गीतानंतर भैरवी ने मैफिलीची सांगता झाली. तबल्यावर नाशिकच्या गौरव तांबे, संवादीवर पुष्कराज भागवत यांनी साथ केली. तानपुऱ्यावर अथर्व मुंडले व वरुण नेवे यांनी साथ केली. कार्यक्रम यशशवितेसाठी प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरुण नेवे आशिष मांडे, निनाद चांदोरकर, वरुण देशपांडे, स्वानंद देशमुख यांनी परिश्रम घेतले

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close