
नशिराबाद नगरपरिषद समोर नागरी समस्या सोडवण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन. तीस दिवसात कामे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार – नशिराबाद नागरि कृती समिती
ब्यूरो चीफ आर के जोशी
नशिराबाद नगरपरिषद अस्तित्वात आल्या पासून नशिराबाद नागरिक कृती समितीमार्फत नऊ वार्डातील ६४ नागरी समस्यांबाबत वारंवार निवेदन व तक्रारी देऊन सुद्धा काही एक कारवाई होत नसल्याने नाईलाजास्त बुधवार २ नोव्हेंबर 22 रोजी नशिराबादनागरिक कृती समितीतर्फे पूर्व सूचना देऊन नगरपरिषद नशिराबाद येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात नऊ वार्डातील सुमारे १४३महिला व १९० पुरुषांची उपस्थिती होती
धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या
कादरीनगर, ताज नगर, मनियार मोहल्ला,नीचवास मोहल्ला, हेडकर अली मोहल्ला, चौपाल मोहल्ला, बालेमिया मोहल्ला, बारादरी मोहल्ला या वार्डातील गटारी व त्या वरील ढापे, रस्ते डांबरी व सिमेंटचे रस्ते,
साफसफाई, आरोग्य,पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्रा ची वेळ वाढवून मिळणे बाबत,शववाहिका व ॲम्बुलन्स सेवा बाबत इत्यादी ६४ मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांना नागरिक कृती समिती नशिराबाद तर्फे देण्यात आले.
धरणे आंदोलनात यांनी केले मार्गदर्शन
जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे फारुकशेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद सर, कारी अब्दुल रऊफ, फुरकान शेख, सलमान सुतार,आकिब शेख,वासिफ सय्यद, रईस सय्यद, सौ नजमा बी,सौ शहेनाझ बी, जूबेदा बी यांनी मार्गदर्शन केले.
आंदोलन त्यासाठी यशस्वी यशस्वी ते साठी अब्दुल रउफ टेलर, इब्राहिम टेलर, तोफिक खान, नाझीम सय्यद, नजर अली, अन्सार मनियार, युसुफ बेग,पि.के.
शेख,वकार अली बिस्मिल्ला सुतार,आदींनी प्रयत्न केले
आंदोलनाचे प्रास्ताविक सलमान सुतार, सूत्र संचालन फुर्कान शेख व आभार आसिफ मुबल्लिग यांनी मानले व नंतर दुआ ने सांगता झाली.तीस दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नागरिक कृती समितीने या मागण्या बाबत ३० दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यात रस्ता रोको आंदोलन ,साखळी उपोषण, आमरण उपोषण जेलभरो आंदोलन ,यांचा समावेश असेल असे सुद्धा कृती समितीचे समन्वयक वासिफ सय्यद यांनी लेखी स्वरुपात प्रशासनाला दिलेले आहे
या निवेदनाच्या प्रती जळगाव जिल्हा अधिकारी तसेच पोलिस अधीक्षक जळगाव प्रशासक तथा तहसीलदार जळगाव व सहाय्यक पोलीस निरीक्षक नशिराबाद यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहे.