इकरा बी.एड. कॉलेज मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नवीन अभ्यासकेंद्राचे उद्घाटन

जळगांव: इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा बी.एड. कॉलेज, जळगाव येथे शै. व. २०२२-२३ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे नवीन अभ्यासकेंद्र सुरु झाले आहे. *या अभ्यासकेंद्राला MA-Education (M.Ed.समकक्ष – कालावधी- २ वर्ष), Diploma in School Management (DSM- कालावधी- १ वर्ष) आणि Early Childhood Care and Education (ECCE- बालवाडी शिक्षिका – कालावधी- ६ महीने) या तीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे.* या निमित्ताने नुकताच या नवीन अभ्यासकेंद्राचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रियाज शाह यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली. इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. इरफान शेख यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने अभ्यास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे डॉ. इकबाल शाह यांनी आपल्या भाषणात संस्थेची कार्ये व उद्दिष्टे यांची माहिती दिली तसेच या केंद्रावर सुरु झालेले सर्व अभ्यासक्रम शिक्षकांसाठी कसे उपयोगी आहेत याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. अब्दुल करीम सालार यांनी अभ्यास केंद्राच्या नवीन विद्यार्थी-शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व या सर्व शिक्षकांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे आपले उच्च शिक्षण निरंतर चालू ठेवले आहे ही एक कौतुकाची बाब आहे असे सांगून सर्वांचे अभिनंदनही केले.

या कार्यक्रमात इकरा डी.एल.एड. कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती सईदा वकील, इकरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक जमीर काझी, इकरा युनानी मेडीकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकरा बी.एड. कॉलेजचे प्राध्यापक व य.च.म.मु. विद्यापीठाच्या नवीन अभ्यासकेंद्राचे केंद्र-समन्वयक डॉ. ईश्वर सोनगरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बी.एड. चे प्रा. अजीम शेख यांनी केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close