विभागीय लोकशाही दिनात सहा अर्जांवर सुनावणी..! 

विभागीय लोकशाही दिनात सहा अर्जांवर सुनावणी..! 

 

 

 

औरंगाबाद,

 

विभागीय लोकशाही दिनात प्राप्त सहा अर्जांवरील सुनावणी उपायुक्त जगदिश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  

 

आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या विभागीय लोकशाही दिनात श्री.मिनियार यांनी प्राप्त अर्जावर चर्चा करुन संबंधित विभागाने लवकरात लवकर अहवाल सादर करावा. तसेच प्रलंबित अर्जांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या.

 

महापालिकेचे अतिरिक्त्‍ आयुक्त रवींद्र निकम, आरोग्य विभागाचे डॉ.भूषणकुमार रामटेके, तंत्रशिक्षण विभागाचे उमेश कमळसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक मुख्य अभियंता श्रीमती डाके, समाज कल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकारी संजय देवकाते, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक प्रदिप पोटे, कौशल्य विकास अधिकारी बी.आर.रिठे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी-प्रतिनिधी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close