मायेची चादर’ या उपक्रमात मदत करावी – धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार

 

 

मायेची चादर’ या उपक्रमात मदत करावी धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार

 

 औरंगाबाद,

 

: बेघर निराधार लोकांचे थंडीपासुन संरक्षण होणेकरीता “मायेची चादर” या उपक्रमाअंतर्गत थंडीपासून संरक्षण होणेकरीता ब्लँकेट, चादर इत्यादी वस्तू स्वरूपात समाजातील दानशुर व्यक्ती, संस्था, मंदिरे यांनी मदत मिळवून पुरवावी, असे औरंगाबाद विभागाचे धर्मादाय सह आयुक्त श्री.सुरेंद्र बियाणी यांनी आवाहन केले आहे.

            औरंगाबाद जिल्हा व विभागातील नोंदणीकृत संस्था, मंदिर, न्यास व त्यांचे विश्वस्त समाजातील दानशुर व्यक्तींनी डिसेंबर व जानेवारी महिन्यात खुप मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्यामुळे निराधार, गरीब, बेघर लोकांना जीव गमवावा लागतो. यात बहुतांशी वयोवृद्ध लोक म्हणजे लहान मुले, उघड्यावर राहत असलेले भटके जीवन जगणारे यांना कोणताही कायम आसरा नसल्यामुळे थंडीत कुडकुडत जगावे लागते यांच्या मदतीसाठी मायेची चादर हा उपक्रम धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाच्या समन्वायाने राबविण्याचे हाती घेतले आहे.

            या कार्यक्रमाअंतर्गत औरंगाबाद जिल्हाभरातील संस्था, मंदिर, न्यास व समाजातील दानशुर व्यक्ती यांना आवाहन करुन 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत चादर, ब्लॅकेट धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात जमा करणत येणार आहे. जमा झालेले चादर, ब्लँकेटचे गरजूंना जिल्ह्यात गरजेप्रमाणे व उपलब्धतेनुसार वाटप करण्या येईल.

            मानवेतेच्या दृष्टीकोनातुन कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close