आंतर शालेय हॉकी स्पर्धा,मुलींमध्ये विद्या इंग्लिश, बेंडाळे, व अँग्लो उर्दू विजयी तर मुलांमध्ये विद्या व गोदावरी विजेते

जळगाव__जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आंतर शालेय मनपा स्तरीय हॉकी स्पर्धा १४,१७ व १९ वयोगटातील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यात*१४ वर्षे आतील मुलांच्या गटात गोदावरी विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजयी.*१७ वर्षे वयोगटात मुला मध्ये विद्या इंग्लिश स्कूल विजयी व गोदावरी उपविजयी*१९ वर्षे मुलांच्या गटात एकही संघाचे प्रवेश नाही*१४ वर्ष वयोगटात मुली मध्ये विद्या इंग्लिश स्कूल विजयी तर गोदावरी उपविजयी,*१७ वर्षे वयोगटात डॉक्टर अण्णासाहेब जीडी बेंडाले विजयी तर गोदावरी इंग्लिश मीडियम उपविजयी*१९ वर्षे आतील मुलींच्या गटात अँग्लो उर्दू हायस्कूल जळगाव विजयी.

*पारितोषिके*
विजयी व उपविजयी संघातील प्रत्येक खेळाडूला सुवर्ण व रजत पदक स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे देण्यात आले
सदर बक्षीस जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्राय इव्हेंट च्या संचालिका यामिनी कुलकर्णी, जी डी बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका सरिता चीरमाडे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख व सहसचिव लीयाकत अल सय्यद यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी क्रीडाशिक्षक वसीम मिर्झा, युसुफ शेख, शहबाज शेख, विद्या बनसोड, मुजफ्फर शेख आदींची उपस्थिती होती

स्पर्धेचा अंतिम निकाल
*१४ वर्षाआतील मुले*
गोदावरी स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०)
*१४ वर्षाआतील मुली*
विद्या इंग्लिश स्कूल वी वी गोदावरी स्कूल(२-०)
*१७ वर्षाआतील मुले*
*उपांत्य सामना*
विद्या इंग्लिश वी वी अंगलो उर्दू स्कूल (१-०)
*अंतिम सामना*
विद्या इंग्लिश वी वी गोदावरी स्कूल (३-०)
*१७ वर्षाआतील मुली*
*उपांत्य सामना*
बेंडाले कॉलेज वी वी विद्या इंग्लिश स्कूल (५-०)
*अंतिम सामना*
बेंडले कॉलेज वी वी गोदावरी स्कूल (१-०)
*१९ वर्षा आतील मुले*
अंग्लो उर्दू ज्यू कॉलेज वी वी मिल्लत उर्दू स्कूल (२-०)
*१९ वर्षाआतील मुली*
अँगलो उर्दू ज्यू कॉलेज बिनविरोध विजयी
स्पर्धेत पंच म्हणून लियाकत अली,मुझफ्फर शेख, चेतन माळी, धीरज जाधव, हरी सैनी, दिनेश ओडिया, इद्रिस शेख, शाहेझाद शेख, कृष्णा राठोड यांनी काम केले
पारितोषिक वितरण
खेळाडूंना नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील व यामिनी कुलकर्णी यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेसमारंभाचे सूत्रसंचालन व आढावा फारुख शेख यांनी सादर केला तर आभार लियाकत अली सय्यद यांनी मानले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close