
नागरिक म्हणून आपल्याला आपल्या देशाची राज्यघटना माहित असणे आवश्यक आहे.”,मिल्लत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित संविधान दिन समारंभात एडवोकेट सिद्दिक यांचा विद्यार्थ्यांना संदेश ,मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचेही स्मरणही करण्यात आले.
जळगाव : विद्यार्थ्यांना आपली राज्यघटना आणि त्याच्या निर्मितीत निर्मात्यांचे प्रयत्न याची माहिती व्हावी, या उद्देशाने 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात संविधान दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने मिल्लत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मेहरून येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. सुरुवात इयत्ता १२वि चा विद्यार्थी झिशान खलील शाह याच्या कुराण पठणाने झाली, ज्याचा अनुवाद साबा
कौसर आसिफ खान यांनी केला. हलीमा मोईनुद्दीन, फिरदौस खलील शाह, हारूननिसा बादशाह यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना अनुक्रमे उर्दू, मराठी आणि इंग्रजी भाषेत सादर केली. याशिवाय 11वी च्या मेअराज बानो ह्या विद्यार्थिनीने भारताचे संविधान इंग्रजी भाषेत सादर करून दाद मिळवली. संविधानशी संबंधित विविध माहितीपूर्ण व्हिडिओ, सोबतच मुंबई हल्ल्या बाबत माहितीपट प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आले. मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचेही स्मरणही या वेळी करण्यात आले. या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे वकील, एडवोकेट सिद्दीक शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, कोणत्याही देशातील प्रत्येक नागरिकाला त्या देशाचे कायदे माहित असणे आवश्यक आहे, त्यांनी भारताची न्यायव्यवस्था, कायदा बनण्याची प्रक्रिया आणि त्याच्या अंमलबजावणीची संपूर्ण माहिती देताना विद्यार्थ्यांना कायद्याची पदवी मिळवून देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासोबतच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अतिशय मनोरंजक पद्धतीने समाधानकारक उत्तरेही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अफिफा शाहीन मॅडम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना बद्दल आनंद व्यक्त केला. वकील आणि न्यायाधीश होऊन देशसेवा करा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमापूर्वी हायस्कूलच्या इतिहास विभागाच्या अध्यक्षा नझमा मॅडम यांनी भारतीय राज्यघटनेची रंजक माहिती सांगितली. शफकत हुसेन सर, वसीम शेख सर, जुबैरुद्दीन शेख सर, अतिकुल्लाह खान सर ज्युनियर कॉलेजच्या शाह सुमय्या मॅडम आणि फरहाना मॅडम उपस्थित होत्या. पर्यवेक्षक ताजुद्दीन शेख सर यांनी आभार व्यक्त केले. ज्युनिअर कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रभारी शेख ज़य्यान अहमद सर यांनी सूत्रसंचालन केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज़य्यान अहमद सर सोबत अतिकुल्लाह खान सर यांनी परिश्रम घेतले.