महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम तर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांना अल्पसंख्यांक हक्क दिवस बाबत निवेदन

जळगाव __अल्पसंख्यांक हक्क दिन १८ डिसेंबर बाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात किमान एक लाख रुपयाचे निधीसह तातडीने आदेश द्यावे, अल्पसंख्यांक हक्क दिवस निमित्त जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अल्पसंख्यांक समितीचे सदस्य, अल्पसंख्यांक समाजातील सर्व राजकीय, शैक्षणिक, संस्था प्रतिनिधी, समवेत अल्पसंख्यांक विकास जनजागृती व विकास कामांचे आढावा बैठक घेऊन समाजाचे न्याय हक्काचे प्रश्न सोडवावे. जिल्हा अल्पसंख्यांक विकास सनियंत्रण समितीची स्थापना करावी, त्या समितीत अशासकीय सदस्य संख्या तीन ऐवजी सहा करावी, पंतप्रधान १५ कलमी अल्पसंख्यांक विकास कार्यक्रम राबवणे बंधनकारक करावे, तसेच तसेच नुकतीच प्री मॅट्रिक्स स्कॉलरशिप योजना बंद करण्यात आली आहे ती पुनश्च सुरू करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मायनॉरिटी एनजीओ फोरमचे संस्थापक अध्यक्ष जाकीर सिकलगर यांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या माध्यमाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिले असून त्याची एक प्रत जिल्हाधिकारी जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.

निवेदन देताना यांची होती उपस्थिती

एटीएम चे अध्यक्ष एजाज मलिक, अलखैर ट्रस्टचे अध्यक्ष युसुफ शाह, जमियत उलमाचे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, अलहिंद ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताफ शेख, ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, सिकलगर बिरादरीचे अन्वर खान, काँग्रेस युवकचे महाराष्ट्राचे सहसचिव मुक्तदिर देशमुख, राज मोहम्मद खान शिकलगार, याकूब खान मकसूद खान, ईदगाह ट्रस्ट चे अनिस शहा, माझी कुलसचिव डॉक्टर रफीक काझी, शिवसेना महानगर अध्यक्ष जाकिर पठाण, काँग्रेस महानगर अध्यक्ष अमजद पठाण, आदींची उपस्थिती होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close