युवांचा विश्वास फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेवर _खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

शंकर सिंग ठाकूर

रांजनगाव __ युवासेनेचे पुणे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले, युवासेनेचे शिरूर समन्वयक वैभव खेडकर व अजित शिंदे सरकार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उपनेते, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नंदनवन, मुंबई येथे जाहीर प्रवेश केला. या सर्व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी सामनामधून नियुक्ती करण्यात आली होती.महाराष्ट्राचे युवा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी युवांचा विश्वास फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे असे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे सांगितले .याप्रसंगी युवासेना सचिव पुर्वेश सरनाईक, किरण साळी, युवासेना राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, युवासेना आंबेगाव तालुकाप्रमुख वैभव पोखरकर, युवासेना रांजणगाव शहरप्रमुख अक्षय खेडकर व अनिकेत खेडकर यांच्यासह शिरूर लोकसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close