
के. के.उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये “जागतिक मानव हक्क दिवस” संपन्न
जळगाव, येथील अंजुमने खिदमते खल्क संचलित के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व डॉ शाहीन काझी ज्युनिअर कॉलेज मध्ये “जागतिक मानवी हक्क दिवस” मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात. आला यावेळी तन्वीर
जहाँ शेख यांनी मानवी हक्काच्या इतिहास व जगण्याकरिता माधव अधिकारांची का गरजेचे आहे? याबद्दल विचार व्यक्त केले मुस्ताक भिस्ती यांनी मानवी हक्क जगाने व भारताने का व कसे स्वीकारले याबद्दल विचार व्यक्त केले तबरेज़ शेख यांनी इस्लाम धर्म व मानवी हक्क या विषयावर विचार व्यक्त केले तसेच अकरावीच्या विद्यार्थिनी शेख सीमा अब्दुल अहद व फरहीन इरफान शेख यांनी देखील विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाचे जमिनीला शेख, असमा शेख यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मुश्ताक भिस्ती यांनी केले आभार लईक शाह यांनी व्यक्त केले.