
केळद ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक 2022मध्ये लोकशाही चा विजय
शंकर सिंग ठाकूर
रांजनगाव _ केळद ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक 2022मध्ये ग्रामपंचायत मधील 1178 पैकी 969मतदार राजांनी आपला मतदानाचा हक्क बजावून
ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये लोकशाही चा विजय केला. या बद्दल प्रकाश तुकाराम भावळेकर (जनसेवक ) सदस्य. ग्रुप ग्रामपंचायत केळद यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले ..आपण दिलेला निकाल हा फक्त विजयचा आनंद साजरा करण्यापुरता नसुन हा निकाल आपले उपकार मी संपूर्ण जीवनात कधीच विसरू शकणार नाही कारण एका गरीबाच्या पोराला
लोकांनी विश्वास दाखवून 969 मतदान पैकी 680 मतदान सर्व मतदार माय बाप्प जेनतेनी आम्हा मिळवून दिले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 423 मतदानाचे लीड तालुक्यातील सर्वात जास्त लीड आहे. आपण सरपंच पदा साठी अश्विनी ऋषिकेश भावळेकर यांना मिळवून दिले तसेच सदस्य पदा साठी 314मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . त्यापैकी 229 मतदान गोर गरीब मायबाप जेनतेनी हक्क चा माणूस म्हणून मिळवून दिले . 152 मताच्या लिडणे विजय मिळवून दिला .हा विजय केळद ग्रामपंचायत मधील इतिहास घडवणारा विजय आहे आणि माझ्या सारख्या कार्यकरत्याला संपूर्ण जीवनात समाज
सेवेसाठी मिळालेले आशीर्वाद आहेत .या सर्व विजया मध्ये ग्रामपंचायत मधीलकर्णवड, भोर्डी, केळद व दोन्ही केळद वाडी,निगडे ,पिशवी ,गुगुळशी, पांगरी या सर्व गावातील लोकांनी विजय मिळवून देण्यासाठी दहिवड.(महाड ).पुणे. फलटण. रांजणगाव, पुणे ,आकुर्डी,मुंबई,बिरावाडी, गुजरात या सर्व ठिकाणावरून लोकांनी येऊन आपले मतदान हक्क बाजावून विजय मिळवून दिला . याबद्दल प्रकाश
तुकाराम भावळेकर (जनसेवक ) सदस्य. ग्रुप ग्रामपंचायत केळद यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले .