
के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिना निमित्त “गणित प्रदर्शनी” चे आयोजन
जळगाव; येथील अंजुमने खिदमते खल्क संचलित के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व डॉ शाहीन काझी ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक ख्यातीचे
गणितज्ज्ञ “डॉ.श्रीनिवासन रामानुजन” यांच्या जयंतीनिमित्त *राष्ट्रीय गणित दिवसा* निमित्ताने *गणित प्रदर्शनी* चे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष डॉ.अल्हाज अमानुल्लाह शाह, उपाध्यक्ष अल्हाज अ. मजीद सेठ ज़करीया सदस्य जाहीद शाह, डॉ. जावेद अख्तर , साजीद रज्जाक सर , सेवा निवृत्त मुख्याध्यापक शेख असलम , व्यवसायिक कुतबुद्दीन भाई इंदोर वाला, मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिस शेख यांची प्रमुख उपस्थिती होती गणित विभागाचे ज्येष्ठ शिक्षक शाह जाकीर व अ.कय्युम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी गणित प्रदर्शनात भाग घेतले यावेळी उपस्थित डॉ. अल्हाज अमानुल्लाह शाह यांनी आयोजक वर्ग व सहभागी विद्यार्थिनी चे कौतुक करून अशयाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांमध्ये गणित सारख्या कठिण विषयांसंबंधी रूची व गोडी निर्माण करावी या साठी सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल या बद्दल आश्वासन दिले तसेच कुतबुद्दीन इंदोर वाला यांनी देखील प्रदर्शनी पाहून आपल्या विद्यार्थी काळातील आठवणींना उजेड दिला मुख्याध्यापिका
तन्वीर जहाँ शेख यांनी प्रदर्शनी बद्दल गणिता शिक्षक व विद्यार्थीनींनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कौतुक केले. या प्रदर्शनात गणिताचे चार्टस, सुत्रे पाठ करून विद्यार्थिनींनी खेळीमेळीच्या वातावरणात सहजपणे आपण गणिताचे धडे कसे पाठ करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. सदरहू प्रदर्शनी ला शहरातील विविध शाळेतील शिक्षक व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन कौतुक केले. सफल आयोजनासाठी मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.