
संगीत क्षेत्रात नव कलाकारांच्या प्रतिभेला सन्मान मिळतो,- नियमित सराव आणि कठोर परिश्रमामुळे यशोशिखर काबीज करता येते – पद्मश्री अनुप जलोटा
मुंबई :संगीत क्षेत्रात नव कलाकारांच्या प्रतिभेला नेहमीच सन्मान मिळतो.नियमित सराव आणि कठोर परिश्रमामुळे यशोशिखर काबीज करता येते. आपल्या अंगच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून योग्य गुरुच्या सानिध्यात आणि मार्गदर्शनात कठोर परिश्रम व सराव केल्यास यश प्राप्ती नक्कीच होते.प्रेक्षकांच्या मनात आपल्या दर्जेदार कलेचे स्थान निर्माण केल्यास काहीच कमी पडत नाही म्हणून या क्षेत्रात आपले करियर करणाऱ्या नव कलाकारांनी प्रामाणिकपणे अविरत कष्ट करण्याची तयारी ठेवावी म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल असा वडीलकीचा सल्ला नव कलाकार आणि उपस्थित प्रेक्षकांना संगीत क्षेत्रातले दिग्गज गायक पद्मश्री अनुप जलोटा यांनी दिले.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक राजकिशोर ठाकूर यांनी अनुप
जलोटा यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
जुहू येथील इस्काॅन ऑडीटेरिएममध्ये गुरुवार ता.12 रोजी सायंकाळी 8 वाजता स्वर सुधा सांस्कृतिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आयोजित स्वरसुधा संगीत कार्यक्रमात आपली कला सादर करते वेळी मार्गदर्शन करताना केली.