जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

जळगाव  – अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर १२ वर्षे खालील मुलांच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि. १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी ठरला आहे.
या स्पर्धेत शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूर, नाशिक क्रिकेट ॲकॅडमी नाशिक, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा ऑरेंज जळगाव, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा ब्ल्यू जळगाव या चार संघांनी सहभाग घेतला होता. सर्व सामने लीग पद्धतीने खेळविण्यात आले. त्यात नाशिक क्रिकेट ॲकॅडमी सर्व सामने जिंकून आणि जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी ब्ल्यू दोन सामने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी ब्ल्यू संघ विरुद्ध नाशिक क्रिकेट ॲकॅडमी नाशिक यांच्या दरम्यान झाला. जैन स्पोर्ट्स ब्ल्यू संघाने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करत ३० षटकात ८ गडी बाद १०८ धावा केल्या. त्यात मानस पाटील ४२, दक्ष आठवले १९ व अहमद खान नाबाद १० धावा यांचे योगदान होते. गोलंदाजीत नाशिक क्रिकेट ॲकॅडमीतर्फे राजवीर बोथरा व मंथन पिंगळे प्रत्येकी ३ गडी बाद केले. १०९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या नाशिक क्रिकेट ॲकॅडमी संघ २१.४ षटकात सर्व गडी बाद ९५ धावा करू शकला. त्यात रियांश मुंदडा १९ आर्यन गवळी नाबाद १४ व आर्य पारख १२ धावा करू शकले. गोलंदाजीत जैन स्पोर्ट्स संघातर्फे रोनक मिश्रा व अमेय चौधरी प्रत्येकी २ गडी बाद केले तर चार फलंदाज धावबाद झाले आणि हा सामना जैन स्पोर्ट्स ब्लू संघाने १३ धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मानस पाटील व अमय चौधरी या दोघांना देण्यात आला. मालिकावीर म्हणून नाशिक क्रिकेट ॲकॅडमी आर्यन घोळके, उत्कृष्ट फलंदाज म्हणून जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा मानस पाटील, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचा अमेय चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. बक्षीस समारंभ अंतिम सामन्यानंतर लगेच घेण्यात आला. याला जैन इरिगशनच्या कृषितिर्थ मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांच्या मुख्य उपस्थितीती होती. या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, नाशिक संघाचे प्रशिक्षक श्रीरंग कापसे, जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे प्रशिक्षक मुस्ताक अली व तन्वीर अहमद, फजल मोहंमद व पालकवर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close