
मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले, अशी घ्या काळजी..!
मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले, अशी घ्या काळजी
आपल्या चिमुकल्यांना सांभाळा. कारण RSV Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus या चार व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे औरंगाबादमधील बाल रुग्णालये फुल्ल झाली आहेत. मुलांना तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकला, आदी लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवा, असं आवाहन केलं जात आहे.
औरंगाबादमधील रुग्णालयात आजारी चिमुरड्यांची गर्दी वाढली आहे त्याच कारण आहे RSV, Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus हे चार व्हायरस. 2019 नंतर Adenoviruses व्हायरसची एक लाट आलेली पाहायला मिळाले आहे. या व्हायरसमुळे रुग्णालयात हाऊसफुल्ल झाली आहेत.
RSV हा व्हायसर हा एक वर्षाखालील मुलांना त्रास देतो. तर Influenza A (H3N2) Variant Virus, Adenoviruses, Influenza A virus व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे एक वर्षाच्या बाळापासून ते दहा वर्षांच्या मुलांमध्ये दिसत आहेत. या चार व्हायरसपासून आपल्या मुलांना सांभाळा. हे चारही व्हायरसचा प्रसार हवेतून होतो. यातील Influenza A (H3N2) Variant Virus आणि Adenoviruses हे व्हायरस मुलांना अधिक त्रासदायक आहेत. त्यामुळे मुलांची काळजी घ्या, असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं.