जळगावात जैन इरिगेशनतर्फे शहरात कोरोना सर्वेक्षण सुरू,तीन दिवसात ५५६६ जणांची तपासणी 

जळगांव 
  कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जळगाव शहरात लॉकडाऊन करण्यात आला. या काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स, कांताई नेत्रालय, जैन हेल्थ केअर आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यातर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन दिवसात १५९६ घरांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून ५५६६ जणांची तपासणी करण्यात आली.कोरोना सदृश्य लक्षणांचे रूग्ण शोधण्यासाठी जळगाव महापालिकेच्या सुचनेनुसार सर्वेक्षण केले जात आहे. जैन इरिगेशनचे ४० सहकारी घरोघरी जाऊन प्रत्येकाचे शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजत आहेत. सोबतच कुटुंबात कोणाला ताप, सर्दी, खोकला, दमा, थकवा, हदयविकार, मधुमेह, टिबी किंवा इतर आजारांची माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणातील घेतलेली माहिती संध्याकाळी जळगाव महापालिकेला दिली जाते. द्रोपतीनगर, कल्याणीनगर, मुक्ताईनगर, साईनगर, निवृत्तीनगर, हायवे दर्शन कॉलनी, आहुजानगर, कांताई नेत्रालय परिसरात सर्वेक्षण  सुरू आहे. नागरिकही सर्वेक्षणासाठी पुढे येत आहे. जैन हेल्थ केअर च्या सहकाऱयांना थर्मल गन, ऑक्सीमीटर देण्यात आले आहे. सोबतच सॅनिटायझर, सेफ्टी गॉगल, हॅण्डग्लोज, माक्स, सर्जीकल कोट, फेस शिल्ड सहकाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेच्यादृष्टीने पुरविण्यात आले.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close