जळगाव येथील चित्रकार आनंद पाटील यांचा अनोखा सामाजिक उपक्रम, चित्र विक्रीतून कोरोना करिता निधी 

 
सुनील कुमार ठाकूर ,जळगाव
   कोरोना या प्राणघातक आजारावर मात  करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे.
आज या कोरोनाने आपल्याला सर्व स्तरावरची शिस्त व स्वच्छतेची शिकवण दिली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह डॉक्टर, पोलीस, प्रशासन दिवस-रात्र लढत आहेत. कोरोनामुळे सरकारला संपूर्ण देशात लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे गरिबांचे खाण्या- पिण्याचे पुरते हाल झाले. हे लक्षात घेता काही सेवाभावी संस्थांनी आर्थिक तसेच वेगवेगळ्या मार्गांनी मदतीचा हात गरजवंतांना दिला आहे.जळगाव शहरातील जैन इरिगेशन येथे कार्यरत आर्टिस्ट आनंद पाटील यांनी जलरंगा द्वारे आपल्या विशिष्ट शैलीत सलग पाच दिवस सोशल मीडियावर एक अनोखी चित्रांची सिरीज सुरू केली. त्यांच्या या चित्रांना लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला, काही लोकांनी ही सिरीज लाॅकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवण्याचे ही सांगितले. चित्रांमध्ये दररोज पशु-पक्षी यांच्यातील कुस्तीचे चित्रण केलेले आहे. पहिल्या दिवशी कोंबड्यांची कुस्ती, दुसऱ्या दिवशी बैलांची, झुंज तिसऱ्या दिवशी चिमण्यांची मस्ती, चौथ्या दिवशी कुत्र्याची कुस्ती तर पाचव्या दिवशी वाघांची आपल्या हद्दीवरून दंगल अशा विविध चित्रातून एक चळवळ सुरू केली. भांडण हे कुणाचेही असाे यात हानी ही दोघांपैकी एकाची हाेत असते. या चित्रांमागील उद्देश म्हणजे  ‘आपसातील भांडणे विसरू या, आणि हिमतीने या कोरोनाशी लढू या’ असा मार्मिक संदेश दिला आहे.
या ठिकाणी भांडणंची बरीच उदाहरणे देता येतील. जसे की, कुणी रेशनच्या रांगेतील नंबर वरून भांडतात. कुणी किरकोळ कारणांवरून झगडात, झगड्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणावर होऊन मग ते प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत जाते. त्यातून काय साध्य होते बरे ?  तर काहीच नाही. तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून आपणासर्वांचे हित लक्षात घेता प्रशासनाला मदत करूया. चित्रकार आनंद पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात ७० च्या वर चित्रे रेखाटली  आहेत.पाटील यांनी काढलेली आत्तापर्यंत 10 दहा paintigs विक्री झाल्या आहेत. विक्रीस खूप प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, जळगाव, भुसावळ शहरातून प्रतिसाद मिळाला सदरील चित्रे विक्रीस आहेत. आपणापैकी कुणास चित्रे विकत घावयाची असल्यास
 https://anandpatlipaintings.blogspot.com/2020/06/blog-post.html या लिंकवर भेट द्यावी अथवा ९४२२२७६८२६ या क्रमांकावर संपर्क करावे. या चित्रांच्या विक्रीचा उद्देश असा आहे की या चित्राच्या किंमतीतील ७५ टक्के रक्कम ही शासनाला मदत स्वरूपात दिली जाईल. तरी आपण मदतीचा हात देऊन चित्रे विकत घ्यावी असे आवाहन चित्रकार आनंद पाटील यांनी केले आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close