
शहादा तालुक्यातील पिंपरी शिवारात ५० वर्षीय चंदर मोरे नामक इसमाची हत्या
शहादा तालुक्यातील पिंपरी शिवारात ५० वर्षीय चंदर मोरे नामक इसमाची हत्या करण्यात आली आहे.पिंपरी शिवारातील उसाच्या शेतात चंदर दामू मोरे वय ५०वर्ष रा.पिंपरी हा मृत अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ उडाली.चंदर मोरे हा आपल्या गावातील व्यक्ती सोबत सायंकाळी नेहमीप्रमाणे म्हसावद येथे जातो असे सांगून घरातून निघाला.मोरे हा राञभर घरी परतला नाही.यामुळे त्यांचा मुलगा विष्णू मोरे हा आपल्या पित्याचा शोध घेत होता.शोध घेता–घेता तो काही नातेवाईकांसोबत पिंपरी शिवारातील उसाच्या शेतात गेला.तिथे मोरे यांचा मृतदेह च आढळला.घटनेची माहिती मिळताच शहादा पो.स्टेशन चे निरीक्षक किसन नजन पाटील,पोलिस निरीक्षक निलेश वाघ, दिपक फूलपगारे,राकेश मोरे,संदिप लाडगे,अनमोल राठोड व इतर पोलिस कर्मचारी घटना स्थळी पोहचले.पोलिसांनी तात्काळ घटनेचा तपास करून कालू(वनसिगं) बूघ्या पवार याला पकडून चौकशी केली असता त्याने मित्रासोबत मोरे याचा खून केल्याचे कबूल केले.पोलिसांनी कालू याला अटक करून दुसरा फरार आरोपी ओकार सोनवणे याचा तपास सुरु केला आहे