नेशन्स प्राइड बुक ऑफ *रिकाॅर्ड* मध्ये यावलचे शिक्षक जावेद शेख यांचे नाव समाविष्ट

 

यावल,

येथील सर अहेमद खान उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक शेख जावेद शेख याकुब यांचे नाव नुकतेच *नेशन्स प्राइड बुक ऑफ रिकाॅर्ड*  मध्ये   समाविष्ट करण्यात आले आहे. शेख जावेद शेख याकुब यांनी तब्बल *20 वर्ष* शैक्षणिक क्षेत्रात  उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व सामाजीक तसेच सांस्कृतिक  क्षेत्रात  उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा मान त्यांना मिळाला आहे.

जावेद  याकुब शेख यांनी अनेक कार्य केले. त्यांचे कार्य बघून त्यांना *स्थानिक पातळीपासुन ते जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय,राष्ट्रीय,व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार* मिळाले आहे. शेख जावेद हे तुबा नाज हेल्प मल्टिपर्पज सोसायटी यावलचे अध्यक्ष आहेत व आदिल शाह फारूकी बहुउददेशय संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या संस्थे मार्फत अनेक कार्य केले आहेत व करीत असतात. त्यांच्या मार्फत केलेल्या कार्यांचे प्रस्ताव बघून *नेशन्स प्राइड बुक ऑफ रिकाॅर्ड* मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

विदित व्हावे की,  मानव प्रगती साठी एक डिजीटल बुक रेकॉर्ड आहे. याच्यात समाजाला नविन दिशा दाखवण्याचे उद्देशाने काम करणाऱ्यांची नोंद घेतली जाते. कार्यकारीणीने या  रिकाॅर्डसाठी *जावेद याकुब शेख* यांची निवड केली आहे. यापूर्वी माजी कॅबिनेट मंत्री माधवरावजी जानकार ,गुरु मा  मिना खन्ना, सिमा गुप्ता व राम कुमार पाॅल,  प्रताप चंद्र सारंगी, (केंद्रीय मंत्री भारत सरकार) रमेश बियस  (गवर्नर ञिपुरा ) अनुराग सिंह ठाकुर  (राज्य वित्त मंत्री) सुरेश पुजारी (लोक सभा सदस्य ओडीसा )धरम पाल  गुलाटी  (सि.ई.ओ.इम.डी.एच)असे अनेक लोकांना सन्मानित केले आहे. संस्थेचे संस्थापक गुंजन महेता व सहसंस्थापक पुष्कर मेहता आहे. यावल येथील शिक्षक जावेद शेख यांचे नावे रिकाॅर्ड झाल्याने शाळेतील शिक्षक, कर्मचारी, मित्र

व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

सध्या लाॅकडाॅन असल्यामुळे त्यांना पुर्ण किट टपालने ने प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close