
जळगाव -–मेहरूण स्मशानभूमीच्या खराब झालेल्या रस्त्याची मनपाने घेतली दखल
जळगाव : प्रभाग क्रमांक १४ मधील मेहरूण
स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा पावसामुळे अत्यंत खराब झालेला होता. त्यामुळे शेवटचा प्रवासही जिकीरीचा होता. नेरी नाका स्मशानभूमी ही कोरोना मृतदेहासाठी राखीव असल्याने जळगावातील ईतर मृतदेह हे मेहरूण मधील स्मशानभूमीत आणेले जातात.
भाजपचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनीही या समस्येकडे मनपा प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आंदोलनाचा ईशारा दिला होता. त्या अगोदरच २४ तासाच्या आत मनपा नगरसेवक तथा उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील यांनी या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले.
मेहरूण स्मशानभूमी साठी मनपाला मिळालेल्या १०० कोटींमधून ३७ लाख निधी मंजूर असून, या १०० कोटींच्या निधीवर महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिली आहे, हि स्थगिती उठताच स्मशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील यांनी दिली आहे.