जळगाव — एरंडोल येथील आकाश त्रिवेदी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेत २२६ वा 

जळगाव—
एरंडोल येथील सुप्रसिद्ध वकील ॲड. ओम त्रिवेदी यांचा मुलगा आकाश  हा विज्ञान शाखेतील जेइइ ॲडव्हान्स २०२० परीक्षेत भारतात २२६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला आयआयटी मुबई, दिल्ली, मद्रास, कानपूर किंवा खडकपूर येथे उच्च शिक्षणाची संधी मिळू शकेल. जेइइ ऍडव्हान्स परीक्षेत याप्रमाणे यश  मिळवणारा आकाश हा खान्देशातील एकमेव विद्यार्थी आहे. जेइइ परीक्षेत गुणवत्ता निश्चित झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आयआयटी करून युरोप किंवा अमेरिकेत स्थायिक होतात. तेथे त्यांना विविध प्रकारच्याअभ्यास व कार्याची संधी मिळते.  मात्र आकाशला भारतातच राहून संशोधन क्षेत्रात काम करीत  देशाची सेवा करायची आहे.
आकाश चौथीपर्यंत एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकला. नंतर इयत्ता ७ वीपर्यंत जळगांव येथील काशीनाथ पलोड इंग्लिश स्कूलमध्ये शिकला. त्यानंतर त्याने कोटा येथील ऍलन इज्यूकेशन इन्स्टिट्यूटमध्ये १२ वी पर्यंत शिक्षण घेतले.
आकाशने ७ वीत असताना माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात ९ वा क्रमांक मिळवला होता. ८वीत असताना त्याने क्लासमेट स्पेलबी या राष्ट्रीय परीक्षेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. हा शो डिस्कवरी चॅनेलवरूध जगभर प्रसारित झाला होता. १० वीत असताना केंद्र शासनातर्फे झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ३० वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. ११वीत असताना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या या परीक्षेत अंतिम फेरीत उत्तीर्ण होऊन शिष्यवुत्तीस पात्र ठरला होता. आकाशने शालेय शिक्षणात ओलम्पियाड, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशा अनेक स्पर्धेत अनेक बक्षीसे मिळविली आहेत.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close