मुंबई –खडसे यांनी बंद खोलीत आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही, पण…- चंद्रकांत पाटील

मुंबई/जळगाव : एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे वापरू नयेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत, अशी चर्चा तुम्हीच करता, पण ते पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आजच्या कार्यसमितीच्या बैठकीला ते पूर्णवेळ हजर होते. राष्ट्रगीत आटोपूनच गेले. तुम्ही पत्रकार त्यांना इकडेतिकडे ढकलता, पण ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close