
नांदगांव जवळ पिपरखेड ता नांदगाव येथे मेंढपाल बांधवांच्या बैलगाड़ीला महिंद्रा जीप ची धडक
नांदगांव —नांदगांव जवळ पिपरखेड ता नांदगाव येथे
मेंढपाल बांधवांच्या बैलगाड़ीला महिंद्रा जीप एम एच
15 जीए –2181 ने जोरदार धडक मारल्याने एक बैल जागीच मृत पावला तर दोन मूलं जख्मी झाले आहेत. अचानक झालेल्या या घटनेमुळे धनगर समाजाच्या
महिलांनी टा हो फोड़ला महिलांचा आक्रोश पाहुन वाहनधारक मदतीला धावले. या घटनेत जोरदार धडक देवून महिंद्रा ही पलटली. गाड़ी चा ड्राइव्हर देखील जख्मी झाला आहे.घटनेची माहिती पंकज धनगर
यांनी गणेश जाने ,मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष संदिप मनोरे यांना फोन वर दिली.घटनेची माहिती मिळताच या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नांदगाव पोलीस स्टेशन शी बोलून गुन्हा दाखल करण्यास सांगितले .दुर्घटनेची बातमी कळताच स्थानिक समाज बांधव, धनगर समाज बांधव मदतीला धावला.जख़्मीीना नांदगांव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.घटनेमुळे धनगर समाज मेंढपाल हादरले असून पोलिस आणि समाज बांधव त्यांना धीर देत आहेत.