धुळे – लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिल आल्याच्या तक्रारी,आमदार डॉ.फारूक शहा यांनी एमआयएमच्या शहर कार्यालयामार्फत घेतले तक्रार निवारण शिबीर

धुळे, महाराष्ट्र

अब्दुल रहमान मलिक

धुळे – लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिल आल्याच्या तक्रारी सातत्याने होत असल्याने शहराचे आमदार डॉ.फारूक शहा यांनी एमआयएमच्या शहर कार्यालयामार्फत आज तक्रार निवारण शिबीर घेतले . या शिबीराला वीज वितरण कंपनीचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते . तर शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून वाढीव वीज बिलाच्या तक्रारीचे निवारण यावेळी करवून घेतले . लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ होण्याची मागणी होत असतांना शहराचे आमदार डॉ.फारूक शाह यांनी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पातळीवर हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविला आहे . वीज वितरण कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करतांनाच विधी मंडळातही हा प्रश्न उपस्थित करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला . मात्र तरीही तक्रारी वाढत असल्याने आज वीज वितरण कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत ऐंशी फूटी रोडवरील वडजाईरोड परिसरात असलेल्या यंग एकता सर्कल येथे वीजबिल तक्रार निवारण शिबीर घेतले . यावेळी ग्राहकांना गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून दरम्यानच्या वीज बिलासह यावर्षीच्या एप्रिल ते जून दरम्यानचे वीजबिलाची झेरॉक्स घेऊन उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले होते . यावेळी शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारीचे निरसन करून घेतले . वीज वितरण कंपनीचे अधिकारी बेले , झा , साळुके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तक्रारींचे निराकरण केले . यावेळी ज्यांच्या वीज बिलात खरोखरच वाढ झाल्याचे आढळून आले त्यांची तक्रार नोंदवून घेत लवकरच तो प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले . तर ज्यांचे वीजबिल वाढीव असले तरी बरोबर आहे , असे निदर्शनास आले आणि ते बिल थकीत असेल तर ते भरण्यासाठी दोन ते तीन हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली . या शिबीराच्या यशस्वीतेसाठी आ.डॉ.फारूख शाह यांचे चिरंजीव शाहबाज शाह , एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शमसूल हुदा , शहराध्यक्ष ठेकेदार नुरा शेख , महिला आघाडी अध्यक्षा दिपश्री नाईक , नगरसेवक युसूफ मुल्ला , गनी डॉलर यांच्यासह एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close