धुळे चाळीसगांव रस्त्यावरील गरताड बारीत एका महिलेचा मृतदेह खड्ड्यात बुजलेला आढळून आला

धुळे, महाराष्ट्र

अब्दुल रहमान मलिक

धुळे– चाळीसगांव रस्त्यावरील गरताडबारीत एका महिलेचा मृतदेह खड्ड्यात बुजलेला आढळून आला या घटनेत घातपाताचीच शक्यता असल्याचीच चर्चा होते आहे . धुळे चाळीसगाव महामार्गावर गरताडबारी हा तसा निर्जन परिसर आहे . लळींग कुरणातील जंगलाचाच एक भाग असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांशिवाय अन्य कुणाची वर्दळ नसते . त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुर्तफा दरी , डोंगर आणि झाडी असल्यामुळेच या महिलेचा मृतदेह गरताडबारीत खड्डा खोदून पुरण्यात आला . यामागे पुरावे नष्ट करण्याचा उद्देश असावा . माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक संगिता राउत ह्या आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या . त्यांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात मृतदेह हलवला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते . या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तरी याबाबत मात्र उलटसुलट चर्चा होते आहे .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close