हजरत मो. पैगंबर जयंती निमित्ताने यंग एकता सोशल ग्रुप भोला बाजार आणि AIMIM पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

धुळे,महाराष्ट्र,
अब्दुल रहमान मलिक 
धुळे ….  कोरोना महामारी च्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते.सरकारी निर्देशांप्रमाणे घरात राहण्याच्या सूचना असल्याने मोठे आजार व शस्त्रक्रियेसाठी असलेले रुग्ण यामुळे उपचार घेऊ शकले नाही.आता अन-लॉकडाऊन असल्याने राज्यात कोविडच्या व्यतिरिक्त आजारांवर व शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत.यासाठी रक्ताची आवश्यकता भासत असून धुळे जिल्ह्यात अनेक रक्त पिढ्यांमध्ये रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून जिल्ह्यात रक्तदानाची गरज आहे.याच कारणास्तव कोविडच्या व्यतिरिक्त आजारांवर व शस्त्रक्रियेसाठी रक्त
पिढ्यांमध्ये रक्त पुरवठा करण्यासाठी यंग एकता सोशल ग्रुप आणि AIMIM पक्षाच्या वतीने हजरत मो. पैगंबर जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी AIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष समसूल हुदा, शहराध्यक्ष नुरा शेख, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक,शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, युवा अध्यक्ष सेहबाज शाह, युसुफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठान, गनी डॉलर तसेच AIMIM पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासह यंग एकता सोशल ग्रुप भोला बाजारचे सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन तसेच नियोजन धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांच्यासह आसिफ भोलू शाह यांनी केले.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close