आईने काय शिकवण दिली माहिती नाही, पण बाप म्हणून माफी मागतो; जानच्या चुकीसाठी कुमार सानूंचा माफीनामा

आकाश सुनीलकुमार ठाकूर–/

 

आईने काय शिकवण दिली माहिती नाही, पण बाप म्हणून माफी मागतो; जानच्या चुकीसाठी कुमार सानूंचा माफीनामा

कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणावरुन सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर कलर्स वाहिनेनी अधिकृतपणे याप्रकरणी माफी मागितली होती. आता जान कुमार सानूचे वडील गायक कुमार सानू यांनीही आपल्या मुलाने केलेल्या व्यक्तव्यावरून माफी मागितली आहे. कुमार सानू यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांना माफी मागितली आहे.

कुमार सानू यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून ते म्हणाले आहे की, ‘वडिलांच्या नात्याने मी माझ्या मुलाच्या कृत्याबद्दल तुमची केवळ माफी मागू शकतो. मी ऐकलं आहे की, माझा मुलगा जानने असं काहीतरी वक्तव्य केलं, जे गेल्या 41 वर्षांमध्ये माझ्या मनात कधीच आलं नाही. महाराष्ट्र, मुंबई आणि मुंबा देवीने मला आशीर्वाद दिला आणि मला नाव, प्रसिद्धि आणि सर्व काही दिलं. मी मुंबादेवी आणि महाराष्ट्राबाबत अशा गोष्टींचा कधीच विचार करू शकत नाही. माझं भारताच्या सर्वच भाषांवर प्रेम असून मी त्यांचा सन्मान करतो. मी विभिन्न भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.’

व्हिडीओमध्ये कुमार सानू म्हणाले की, ते आपल्या कुटुंबापासून 27 वर्ष दूर राहिले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलाचं संगोपन करणाऱ्या त्यांच्या पत्नी रिता यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढंच नाहीतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचाही उल्लेख केला. हा व्हिडीओ टीव्ही9च्या पत्रकार शिवांगी ठाकूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

जान कुमार सानू यांनेही आपल्या वक्तव्यासंदर्भात माफी मागितली असून यासंदर्भातील व्हिडीओ एका चॅनलनेही प्रसिद्ध केला होताय या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, जान कुमार सानूचा माफीनामा जो त्यांनी मराठी भाषेसंदर्भातील आक्षेपार्ह्य वक्तव्यासाठी दिला होता. हा व्हिडीओ 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close