जामनेर—पी.टी.पाटील यांच्या “स्वच्छता” नवोपक्रमाची जि. प. शिक्षण विभागाने घेतली दखल

.जामनेर – तालुक्यातील जि. प. संतोषीमातानगर, पहूरपेठ शाळेचे तत्कालीन ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या आपला जिल्हा, आपले उपक्रम ई बुक भाग ३ मध्ये घेण्यात आली. जामनेर तालुक्यातील हा एकमेव उपक्रम असून ई बुकात पाचव्या क्रमांकावर त्यांच्या उपक्रमाची दखल घेण्यात आली आहे.
मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी “स्वच्छता” विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या विकासासाठी उपक्रम” हा उपक्रम मार्च २०२० मध्ये महिन्यात राबविला आहे. लॉकडाऊनच्या काळात पी.टी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन घराची, शाळेची स्वच्छता , कपड्यांची स्वच्छता , शौचालयाची स्वच्छता, परिसर स्वच्छता, अन्नाची स्वच्छता, पाण्याची स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व या बाबतीत शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे.
या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळले. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ बनले. विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी आवड निर्माण झाली. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागल्या. विद्यार्थ्यांना नीटनेटके व स्वच्छ राहण्याच्या सवयी लागल्या. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर इतर स्वच्छते विषयी विद्यार्थ्यांनी काळजी घेतली. स्वच्छतेच्या सवयी अंगिकारल्या. स्वच्छतेच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना झाली. स्वच्छतेच्या नवोपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अस्वच्छतेविषयी अज्ञान दूर झाले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला. पी.टी.पाटील यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेत “स्वच्छता” हा उपक्रम दररोज सकाळी ७ ते ८.३० वाजेच्या दरम्यान शालेय आवारात व परिसरात यशस्विपणे राबविला.
नवोपक्रमाचे फायदे- विद्यार्थी सुका कचरा व ओला कचरा ओळखू लागले व वेगवेगळा करू लागले. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी व रोगराई पसरते, हे विद्यार्थ्यांना समजू लागले. पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करू लागले. बाहेरुन आल्यानंतर हात – पाय स्वच्छ धुवू लागले. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये, हे विद्यार्थ्यांना समजू लागले. कपडे धुण्यासाठी साबण, डिटर्जंट, ब्रश इत्यादींचा वापर करू लागले. विद्यार्थी दररोज दात स्वच्छ घासू लागले. विद्यार्थ्यांचा नकारात्मक दृष्टीकोन बदलला. कृतीतून स्वच्छता करता येते, हे विद्यार्थ्यांना कळले. आरोग्य विषयी माहिती कळली व ज्ञानात भर पडली. स्वच्छता उपक्रमातून विद्यार्थी दररोज वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, शाळेची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, अन्नाची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता, पाण्याची स्वच्छता, शौचालयाची स्वच्छता करू लागले.
“स्वच्छता” या उपक्रमाबद्दल पी.टी.पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी व त्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळण्यासाठी हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम राबविण्यासाठी जळगाव डायट च्या प्राचार्या श्मंजूषा क्षिरसागर, जामनेर पं.स.गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले. पी.टी.पाटील हे सध्या जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेत कार्यरत अाहेत. ते तेथेही कोरोनाच्या काळात शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अॉफलाईन शिक्षणाबरोबर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. शाळेतील पदवीधर शिक्षक देवाजी पाटील, उपशिक्षक रवींद्र चौधरी, विकास वराडे, जयंत शेळके, जयश्री पाटील, छाया पारधे, रामेश्वर आहेर तसेच शाळेतील विद्यार्थी तसेच पालक स्वच्छता बाबत काळजी घेत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close