
जळगाव –सुप्रीम कॉलनीतील पाणी टाकीच्या बांधकामाची महापौर यांनी केली पाहणी.
जळगाव : अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या अंडरग्राउंड टाकीचे काम अंतीम टप्प्यात आले असून वरील कामकाज सुरू आहे. सुप्रीम कॉलनीवासियांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी लवकरात लवकर मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम करावे अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.सुप्रीम कॉलनीतील पाणी टाकीच्या बांधकामाची मंगळवारी महापौर सौ.भारती
सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, गटनेते भगत बालाणी, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, संदीप बऱ्हाटे, ऍड.संदीप पाटील, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, शाखा अभियंता विलास पाटील, अमृत योजना मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे, शाहिद सैय्यद, चंद्रकांत भापसे, रउफ खान, अजमल शाह आदी उपस्थित होते.