
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या ठीकठिकाणी सभा
आकाश सुनीलकुमार ठाकूर
औरंगाबाद.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या ठीकठिकाणी सभा
कॉर्नर सभा, बैठका, मतदार भेटीगाठीना प्रतिसाद
पाटणा : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारमध्ये शिवसेना उमेदवार दिले आहे. यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची स्टार प्रचारक म्हणून बिहार विधानसभेची जबाबदारी सोपविली आहे. सोमवार, मंगळवार अनेक ठिकाणी झालेल्या सभा व कॉर्नर बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शिवसेना उमेदवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभा, बैठका, मतदार भेटीगाठीना प्रतिसाद मिळत असल्याने शिवसेना उमेदवाराना मोठ्या मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बिहार पदाधिकारी यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंत उर्फ बंडू ओक,
आनंद तांदूळवाडीकर, विनायक उर्फ गणू पांडे, माजी नगरसेवक सतीश कटकटे यांच्यासह देशभरातील शिवसैनिक प्रचार करत आहे.