जळगाव — पद्मालय देवस्थान दर्शनासाठी खुले

जळगाव —कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत 17 मार्चपासुन शाळा, महाविद्यालय, देवस्थानं बंद ठेवले होते. यानुसार पद्मालय देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान शासनाने राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी खुले केले असल्याने एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थानाचे श्री क्षेत्र गणपती मंदिर सुध्दा उद्या दि.16 पासून भाविकभक्तांसाठी खुले करण्यात येत आहे . सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान श्री गणेशाचे दर्शन भाविकांना घेता येईल. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी श्री क्षेत्र गणपती मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार सद्यपरिस्थितीला अनुसरून देवस्थान दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे . 60 वर्षापेक्षा जास्त वयस्कर असलेल्या भक्तांना व लहान मुलांना मंदिरात प्रवेश नाही देता येणार नाही, दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मास्क अनिवार्य असुन सॕनिटायझ केल्यानंतरच मंदिरात प्रवेश आहे असेल . दर्शन रांगेत शासनाने ठरवुन दिलेल्या सामाजिक अंतराचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असेल . नियमांच्या पालनांसाठी मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. भाविक भक्तांचे आरोग्य सुदृढ रहावे हाच उद्देश विश्वस्त मंडळाचा असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त यांनी केले आहे

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close