जळगावातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसायिक रतनलाल बाफना यांचे निधन,

जळगाव : येथील ख्यातनाम रतनालाल सी. बाफना ज्वेलर्सचे संस्थापक, शाकाहाराचे प्रणेते तथा समाजसेवक रतनलाल बाफना यांचे आज निधन झाले आहे.

रतनलालजी बाफना (वय ८६) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच आज दुपारी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अगदी शून्यातून विश्‍व साकारलेले बाफनाजी यांनी अतिशय सचोटीने आभूषणे विक्रीच्या व्यवसायात लौकीक प्राप्त केला होता. याच्या जोडीला त्यांनी जन्मभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार केला. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणार्‍या रतनालालजी यांच्या जाण्याने जळगावातील एक महनीय व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

*रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले*  अशोक जैन

धार्मिक,आध्यात्मिक प्रवृत्तीचे करुणाशील ह्रदयाचे श्री. बाफनाजींचे आज निर्वाण झाले…
दिवाळीच्या आनंदपर्वात बाफनाजींचे अचानक निरोप घेणे चटका लावणारे आहे.
बाफनाजींसारखी देवमाणसं शरीररूपाने आपला निरोप घेऊ शकतात मात्र, कार्यस्वरूपात त्यांनी संस्कारित केलेली जीवनमूल्ये शाश्वत राहतील.
माणसांवर ,पशूपक्षीप्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे कृतिशील समाजसेवक बाफनाजी सर्वांचेच आवडते ‌होते.
“शाकाहार हाच सर्वोत्तम आहार आहे,” या सत्त्वशील विचाराच्या प्रचारासाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले.
शालेय वयोगटापासूनच जीवन सदाचाराचा सर्वोत्तम संस्कार व्हावा,मुलांची जडणघडण उत्तम व्हावी याकरिताही त्यांनी खूप परिश्रम घेतले. आदर्श नेतृत्व,कर्तृत्त्व आणि दातृत्त्व याकरिता‌ बाफनाजी कायम स्मरणात राहतील..नंदादीपाप्रमाणे! सकल जनासाठी कायम कार्यरत राहणे हाच विचार असल्याने श्रद्देय मोठे भाऊ आणि भाईसाहेब रतनलालजी यांचे ऋणांनूबंध अधिक घट्ट होत राहिले.

अशोक जैन
अध्यक्ष,
जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेड,जळगाव
जळगाव

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close