
जळगाव — सावधान!! पुढे जळगाव आहे, खड्ड्यांच्या गावात आपले स्वागत आहे, पण सांभाळून
जळगाव — महामार्गावरील खड्ड्यांमुळे होताहेत अपघात; तरी प्रशासनाला जाग येईना,….खड्डे देताहेत अपघाताला आमंत्रण: महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी.जळगाव- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौफुली नजीकचा हा खड्डा उठलाय नागरिकांच्या जिवावर, प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची गरज असून अन्यथा येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अपघात झाल्यास लोकप्रतिनिधी यास जबाबदार धरले जातील अशी प्रतिक्रिया अजिंठा हौसिंग सोसायटी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महामार्गावरील खड्ड्यांची दुरूस्ती प्रशासनाने त्वरित करावी अशी मागणी अजिंठा हौसिंग सोसायटीतील मंगलसिंग ठाकूर, व सुरेश बिर्हाडे यांनी केली आहे.
Live Cricket
Live Share Market