बाळासाहेब ठाकरे य्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करतांना पडेगाव मीटमिटा वार्डाचे शिवसैनिक..!

               

आकाश ठाकूर—/

औरंगाबाद

 

 बाळासाहेब_ठाकरे_  य्यांच्या  स्मृतीदिनानिमित्त  विनम्र अभिवादन

हिंदूह्रदयसम्राट

हिंदूह्रदयसम्राट जी अशी व्यक्ती ती जिवनात कोणासमोर झूकली नाही..जी अशी व्यक्ती ती कधीच कोणासमोर हरली नाही.माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला नेहमी बाळासाहेबांची आठवण येत राहिल..१७ नोंव्हेंबर उजाडला तर मला अशा व्यक्तीची आठवण येते ज्याच्यावर मी लहानपणापासून प्रेम केले..लहानपणापासून ज्यांची भाषणे एैकून मी प्रभावित झालो असे एकमेव हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन.

मी आयुष्यात कधी देव पाहिला नाही पण मला देवावर विश्वास आहे.मी हिंदूह्रदयसम्राटांना पाहिल आहे त्यांच्यात मला देव दिसला होता.एक चमत्कारीक व्यक्ती म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्या शब्दाशब्दांवर अमच्यासारख्या शिवसैनिकांत रोमांच पसरत होता.एका शब्दावर पुरी कायनात हलवून टाकणारा या देशात दुसरा कोणी मी पाहिला नाही.

महाराष्ट्रात ज्यावेळी लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळपासून आजपर्यंत सगळ्यांनी सत्तेचा परीपाठ केला परंतू त्या सगळ्यात एक अशी व्यक्ती होती त्यांनी कधी सत्तेचा परीपाठ केला नाही उलट सत्ताधीश त्यांच्यासमोर लोटांगन घालीत होते ते म्हणजे आपले लाडके साहेब.

साहेब आज तुमची आम्हाला एवढी आठवण येत आहे की विचारूच नका…जर मला मरण आलं तर स्वर्गात बाळासाहेबांच्या चरणापाशी मला थोडीशी जागा मिळावी एवढीच माझी देवापुढे इच्छा आहे ती इच्छा जर देव असेलच तर नक्की पुर्ण करेल कारण या जन्मात आम्ही साहेबांशिवाय दुसरा कसला विचार केलाच नाही.

आम्ही जिवनात काही कमवू शकलो असलो वा नसलो तरी “बाळासाहेबांचा शिवसैनिक” हे नाव नक्कीच कमाविले आहोत.आज आमची जी किंमत आहे ती बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे म्हणून किंमत आहे.
अशा महानायकास..हिंदू्स्तानच्या बुलंद आवाजास..तमाम शिवसैनिकांच्या काळजास.. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांस मानाचा मुजरा.

तव स्मरणाने उजाळेल रोज पहाट पुन्हा होणे नाही हिंदूह्रदयसम्राट

|| साहेब |

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close