
बाळासाहेब ठाकरे य्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करतांना बाळासाहेबांचे शिवसैनिक..
आकाश ठाकूर—/
बाळासाहेब ठाकरे य्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करतांना बाळासाहेबांचे शिवसैनिक..!
हाच तो दिवस मन सुन्न झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. रस्त्यावर बसून होतो, ना जेवण ना पाणी काहीच खायचं मन नव्हतं, ईच्छा एकच मनी होती कोणी येईल बाहेर आणि सांगेल साहेब बरे आहेत काळजी करू नका पण बातमी काही अशी आली जनू आपलं आयुष्यच संपलं होतं…
कारण माझे दैवत आम्हाला सोडून देवा घरी गेले होते… पण तरी हा वेडा अजून ही आशा लाऊन बसला होता की, देवाकडे चमत्कार कर अशी प्रार्थना करत बसला होता…, असंच वाटत होतं की चमत्कार होईल, आणि रुद्राक्षधारी हात येईल पण रात्र झाली,
दुसरा दिवस उजाडला आणि माझा देव अनंतात विलीन झाला… जीव लावूनी वेड्यापरी का सोडून गेलात जना…
बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा,
वाट पाहतेय तुमची सेना.
या… परत या… बाळासाहेब परत या…