नितीन गडकरी यांच्या आदेशानंतर आता तरी नागपूर आरटीओतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

नागपुर ,

नरेन्द्र शर्मा, 

मा. परिवहन आयुक्त, मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून नागपुर आरटीओतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार मोठ्याप्रमाणात वाढला आहे.
1) नागपुर ग्रामीण व शहर कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वाहनधारकांकडून प्रत्येक कामाकरिता दलालांच्या माध्यमातून अवैध वसूली करीत आहेत. काम कोणतेही असो पैसे दिल्याशिवाय ते होणार नाही असा नियमच या ठिकाणी केलेला दिसून येतो. आरटीओ इन्स्पेक्टर मोड, शेजवळ, सोनोने, नागरे, पाटिल हे तर कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय करीत नाहीत. दलाला मार्फत पैसे दिल्यावर मात्र गाडी कार्यालयात न आणूनही गाडी पासिंग करून देणे, माणूस हजर नसतानांही लायसन्स देणे अशी कामे करतात. या भ्रष्ट कमाईतील अर्धा हिस्सा बजरंग खरमाटे व मनवर घेत असल्याने ते या भ्रष्टाचारास मुक पाठिंबा देतात अश्या अनेक तक्रारी आहेत.
2) नागपुर आरटीओ अंतर्गत असलेल्या देवरी, कान्द्री, केळवद, देवाडा व सावनेर या पाचही चेकपोस्टवर खुल्लमखुल्ला भ्रष्टाचार सूरु आहे. या ठिकाणी आपल्या जवळच्या इन्स्पेक्टरची ड्युटी लावण्याकरिता मोठी रक्कम व तेथील अवैध कमाईतील अर्धा हिस्सा मनवर व खरमाटे ठेवतात. त्यामुळे नागपुर आरटीओ च्या या पाचही चेकपोस्टवर मोठय़ा प्रमाणात अवैध वसुली खुल्लमखुल्ला सुरू आहे.
3) परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी मैत्रीपूर्ण व अर्थपूर्ण संबंध निर्माण करून आरटीओ विभागातील अधिकार्यांच्या बदल्या करण्याचा सपाटाच बजरंग खरमाटे यांनी लावला असून त्याद्वारे प्रत्येक अधिकाऱ्यांकडून पन्नास/ साठ लाख रुपयांची वसूली ते करीत आहेत.
अशा प्रमाणे भ्रष्ट मार्गातून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करून खरमाटे यांनी प्रचंड संपत्ती जमविली आहे. पुणे-मुंबई येथे फ्लॅट, बाणेर येथे बंगला, शेती फार्म हाऊस, टिव्हि चे पाच मोठमोठे शोरुम व तनिष्कचे दागिन्यांचे भव्य शोरुम अशी 500 करोडपेक्षा जास्त मालमत्ता त्यांनी जमविली आहे.
याबाबत अनेकांनी परिवहन विभागाच्या वरिष्ठांकडे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्याची कोणी दखल घेत नसल्याने त्रस्त झालेल्या वाहतूकदार संघटनांनी परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली व नागपुर ग्रामीणचे आरटीओ बजरंग खरमाटे यांच्या कारभाराची चौकशी करून त्याचे विरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली. परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र लिहून या भ्रष्टाचाराबाबत तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच नागपुरच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने बजरंग खरमाटे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असतांना कारवाई का केली नाही ? आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे व नागपुरच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागातील अधिकार्‍यांचे काही अर्थपूर्ण संबंध आहेत का याबाबतची सुध्दा चौकशी करून दोषींवर ताबोडतोब कारवाई करावी असे परिवहन मंत्री नितिन गडकरींनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे
1) आतातरी नागपुर आरटीओतील भ्रष्टाचार थांबेल का ?
2) भ्रष्ट अधिकार्‍यां विरुद्ध वरिष्ठांकडून काही कारवाई होईल का?
3) भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग जागा होउन आरटीओंवर कारवाई करणार का?
नरेन्द्र शर्मा, नागपुर

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close