ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव; धवन-पंड्याची खेळी व्यर्थ

मुंबई : कांगारूंच्या धर्तीवर पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाची चव चाखावी लागलीये. ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 रन्सने मात करत वनडे सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारताला 375 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना नाकीनऊ आले. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने 90 तर शिखर धवनने 74 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तो प्रयत्न फोल ठरवला.

375 रन्सच्या लक्ष्याता पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. मात्र कर्णधार विराट कोहली तसंच फलंदाज श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही स्वस्तात माघारी परतले.ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झम्पाने 4 तर हेजलवूडने 3 विकेट्स घेतल्या. शिवाय मिचेल स्टार्कनेही 1 विकेट बळी घेतला

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close