
मुंबई —दिलीप कुमार यांचा आज 98 वा जन्मदिन,ट्रेजेडी किंग दिलीप कुमार , हिंदी सिनेमा सृष्टित एकाहून एक सरस अभिनेता झालेत परंतु दिलीप कुमार ऊर्फ युसूफ खान एक वेगळी शैली असलेले महान अभिनेते!
आरिफ आसिफ शेख,
दिलीप कुमार ऊर्फ मोहम्मद युसुफ़ खान भारतीय हिन्दी सिनेमाचे एक प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आहेत.
दिलीप कुमार यांना त्यांच्या कारकीर्दीतील उत्कृष्ट अभिनेता म्हटले जाते. त्रासद भूमिकेकरिता ते प्रसिद्ध झाल्याने त्यांना *ट्रेजेडी किंग* ही संबोधले जाते. दिलीप कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभिनयाबद्दल सर्वोच्च सम्मान दादा साहेब फाळके पुरस्कार तसेच पद्म भूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तानातील सर्वोच्च नागरिक सम्मान ‘निशान ए इम्तियाज’ पुरस्काराने ही सम्मानित केले आहे. दिलीप कुमार वर्ष 2000 मध्ये राज्यसभेचे सदस्य ही राहिले आहेत.
दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी वर्तमान पाकिस्तान स्थित पेशावर शहरात झाला. त्यांच बालपणीच नाव मोहम्मद युसुफ़ खान असे होते. त्यांच्या वडीलांचे नाव लाला गुलाम सरवर होते. जे फळ विक्री करून कुटुंबाचं उदरनिर्वाह करीत असतं. फाळणीच्या वेळी ते परिवारासह मुंबईत स्थायीक झाले. त्यांचे सुरुवातीचे जीवन फार जिकिरिचे होते. वडीलांना फळ विक्रीच्या व्यवसायात तोटा झाल्याने
युसुफ खान पुण्याच्या एक कॅन्टीन मध्ये काम करू लागले. इथेच देविका राणींनी त्यांना पाहिलं आणि त्यांनी दिलीप कुमार यांना अभिनेता बनवलं. देविका राणी यांनी युसुफ़ खान या नावाच्या ऐवजी दिलीप कुमार असे त्यांचे नाव ठेवले. अशा रितिने वयाच्या पंचवीशीत दिलीप कुमार नंबर एक चे अभिनेता म्हणून स्थापित झाले.
दिलीप कुमार यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सायरा
बानो यांच्याशी वर्ष 1966 मध्ये झाला. विवाहाच्या वेळी दिलीप कुमार 44 वर्ष तर सायरा बानो केवळ 22 वर्ष वयाच्या होत्या. 1980 मध्ये दिलीप कुमार यां नी आसमां रेहमान यांच्याशी दुसरा विवाह केला होता.
दिलीप कुमार यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे केली. ज्वारभाटा 1944 मध्ये रिलीज झाला. त्यांचा सर्वात हीट झालेला पहिला
चित्रपट ‘ जुगनू ‘ हा होता. 1947 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने ब़ॉलीवूड मध्ये दिलीप कुमार यांना हिट चित्रपटांचा स्टार म्हणून ख्याती मिळवून दिली. 1949 मध्ये अंदाज मध्ये दिलीप कुमार यांनी प्रथमच राजकपूर यांच्या सोबत काम केले. हा चित्रपटही फार हीट झाला होता. त्यांनतर दीदार (1951), देवदास यातील गंभीर भूमिकांमुळे दिलीप कुमार फार लोकप्रिय झाले आणि त्यांना ट्रेजेडी किंग म्हटले जाऊ लागले. ‘मुगल -ए -आज़म’ मधील मुगल राजकुमार सलीमची भूमिका ही त्यांनी फारच उत्कृष्टपणे निभावली. त्यानंतर दिलीप कुमार यांचे ‘राम और श्याम’, ‘, कर्मा, क्रांति, इज्जतदार, सौदागर अशा एकाहून एक सरस चित्रपट आले आणि दिलीप कुमार यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
गंभीर अभिनेता ते प्रेक्षकांकडे वळणारे *ट्रॅजेडी किंग* दिलीप कुमार आज सक्रिय नाहीत पण त्यांच्या चित्रपटांची लोकप्रियता अजूनही खूपच अबाधित आहे. हिंदी सिनेसृष्टीने अनेक कलाकारांना घडवले पण दिलीप कुमार अशे अभिनेता आहेत ज्याची गोष्टच वेगळी आहे. आज 11 डिसेंबर 2020 रोजी ब्लाॅक बस्टर अभिनेता, ट्रेजेडी किंग *दिलीप कुमार* यांचा 98 वां वाढदिवस आहे. त्याबद्दल त्यांना मन:पूर्वक शुभकामना!