
कोरोनाची टेस्ट न-करणार्या दुकानांवर जळगाव मनपा उपायुक्तांनी केली कारवाई
जळगाव — मनपा प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी, पुर्व तयारी व सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू केली आहेत. संसर्गाचा धोका होऊ शकेल अशा ठिकाणी मोफत कोरोना चाचणीचे आयोजन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्त, यांच्या सुचनेनुसार करण्यात आले होते.
मनपा प्रशासनातर्फे सर्व व्यापारी, कामगार, हमाल, यांनी मोफत कोरोना चाचणी करवून घ्यावी असे आवाहन मनपा प्रशासनाने केले होते. या अनुषंगाने आज मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बाजार पाहणी दौरा करून. या वेळी ज्या दुकानदारांनी कोरोना चाचणी केलेली आहे त्यांचे अभिनंदन केले व ज्यांनी चाचणी केलेली नाही अशांवर कारवाई करत त्यांची दुकाने सील करण्याचे आदेश उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिले. ज्यांनी चाचणी केलेली नाही अशांनी चाचणी होत नाही तो पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे उपायुक्त यांनी दुकानदारांना सांगितले.जळगाव मनपाने केलेल्या कारवाईत जळगावातील दानाबाजारातील १७ दुकाने सील करण्यात आली आहेत.