
धुळे —पोलीस मुख्यालय येथे सबसिडी कॅन्टींग चे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते उदघाटन
- धुळे, महाराष्ट्र,अब्दुल रहमान मलिक
धुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर बाजारामध्ये मिळणाऱ्या वस्तू कमी दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या प्रयत्नातून
न्यू सबसिडी कॅन्टींग चे नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आले आहे याचे उद्घाटन आज विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आले असून यापुढे देखील धुळे जिल्हा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी विविध नामांकित
कंपन्यांचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून त्यांच्यावर बाजारभावापेक्षा अधिकचा डिस्काउंट पोलीस कर्मचाऱ्यांना मिळेल असा प्रयत्न अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यातर्फे सुरू आहे
यावर ही लवकरात लवकर संबंधित कंपन्यांशी चर्चा करून ही स्कीम देखील पोलीस कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून पोलीस
कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर सांगितले आहे.