जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांचे निधन

पुणे — दैनिक जनशक्तीचे संपादक तथा यशस्वी उद्योजक व व्यवसायिक कुंदन दत्तात्रय ढाके (वय४२) यांचे आज पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुंदन दत्तात्रय ढाके (वय ४२) हे पुणे येथील ख्यातनाम सिध्दीविनायक ग्रुपचे संचालक होते. ख्यातनाम रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून त्यांचा लौकीक होता. २०१४ साली दैनिक जनशक्तीच्या माध्यमातून त्यांनी मीडिया क्षेत्रात प्रवेश केला. आज जनशक्तीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे.

आज सकाळी ते पिंपरी-चिंचवड येथे मॉर्नींग वॉकला गेले असतांना चक्कर येऊन पडले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. कुंदन ढाके यांचे पार्थिव त्यांच्या भुसावळातील वेडिमाता मंदिराजवळच्या राहत्या घरी आणले जाणार आहे. आज सायंकाळी ७ वाजता राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून तापी नदीवरील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close