
नंगा आदमी हूँ, माझ्या नादी लागू नका; संजय राऊतांनी भाजपाला दिला दम..!
आकाश ठाकूर—/
नंगा आदमी हूँ, माझ्या नादी लागू नका; संजय राऊतांनी भाजपाला दिला दम
राऊत म्हणालेत, गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालय (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागत आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीने अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माकडांना ही माहिती कुठून मिळाली? ते कालपासून उड्या कसे मारू लागले? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणालेत, केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्या.
भाजपाला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीने कारवाई केली की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षाने भडास काढणे हे लोकांनी गृहीत धरले आहे..…!