
जळगाव पारोळा चौफुलीवर सकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास हॉटेल ओम साई राम नाष्टा सेंटर फोडून हजारोंचा ऐवज लंपास
धुळे, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
धुळे शहरात चोऱ्या , घरफोड्या , चेन स्नेचिंगसह लुटीमारीचे प्रकारएकामागोमाग एक घडू लागलेत . ” पोलिस ठाण्यातच गस्त नावालाच ‘ असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे . जोमात असणाऱ्या चोरट्यांमुळे शहरवासियांची झोप उडाल्याने पोलीस अधीक्षक यांनी चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने
उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे .
आज पहाटेच्या सुमारास पारोळा चौफुली जवळ हॉटेल ओम साई राम हे चोरट्यांकडून फोडण्यात आली सकाळी पाच वाजेच्या सुमारास हॉटेल मालक आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे सुमारे पन्नास ते साठ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे .यामध्ये दोन मोठे सिलेंडर बेसनच्या पोता
बटाट्याच्या पोता इन्वर्टर बॅटरी आणि हॉटेल ला लागणारा किरणा भांडे आणि किमती वस्तू असं चोरून चोरट्यांनी पोबारा केला . घटनास्थळी टेंबे
पडलेली आहे .हॉटेलचे कडी कोंडा तोडून हा प्रकार घडलेला आहे .आज नगर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यात आली.दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.