
धुळे –जनावरे भरलेली पिकअप जब्त
धुळे, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आजाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोल चौकी परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाली एमपी कडून धुळ्याच्या दिशेने एक पिकअप येत आहे त्याच्यात काही संशयास्पद जनावरे भरलेली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर आजाद नगर पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग कर्मचारी यांनी पारोळा चौफुलीवर सापळा रचून एक
पिकप व्हेन ला थांबवण्यात आले पिकप व्हेन थांबताच ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही पळून गेले पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर ही ते सापडून आले नाही त्यानंतर गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये अतिशय निर्दयीपणे पाच गाई कोंबलेले अवस्थेत आढळून आल्या सदर गाडी आणि पाच गाई हे जप्त करण्यात
आले आहे सदर पाच गायी नवकार गोशाळेत जमा करण्यात आली आहे गाडीसह एकूण दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई आजाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे कॉस्टेबल
सैदाने कॉन्स्टेबल संतोष घुगे यांच्यासह आज नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे अधिक तपास राजनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहे