
थर्टी फर्स्ट ला मार्गशीर्षातील गुरुवार, धुळ्याची मांसाहाराकडे पाठ, चिकन-मटण बाजार ओस,यावेळी अनेक जणांकडे शाकाहारी सेलिब्रेशनचा मार्ग अवलंबला जाणार आहे
धुळे, अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट
नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळेच सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधनं असली तरी घरच्या घरी सेलिब्रेशनचे बेत आखले जात आहेत. कुठे ओली पार्टी विरुद्ध सुकी पार्टी असे दोन गट-तट पडले आहेत. त्यातच मार्गशीर्ष महिन्यामुळे 31 डिसेंबरला शाकाहाराचा प्लान
करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. त्यामुळे करवीरनगरीत चिकन-मटण बाजार ओस पडले आहेत.
थर्टी फर्स्ट आणि धुळेकरांचा अनोखं नातं आहे. 31 डिसेंबर ही खास पर्वणी असते. डिसेंबर महिन्याच्या
सुरुवातीपासूनच अनेक जणांना न्यू इयर सेलिब्रेशनचे वेध लागतात. 31 डिसेंबरला कशी सुट्टी टाकायची, कुठे फिरायला जायचं, काय खायचं याचं व्यवस्थित
प्लॅनिंग ठरतं. मात्र यावर्षीचा थर्टी फर्स्ट मार्गशीर्ष महिन्यात आल्यामुळे अनेक खवय्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.