
राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखचा भाजपा तर्फे निषेध व प्रतिमा दहन
जळगाव — राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, औरंगाबाद शहरातील बाजयी पुरात राहण्याऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला नौकरी लावून देण्याचे अमिश दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा आरोप करण्यात आला आहे, या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
१४ नोव्हेंबर रोजी मुंबई जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोड वरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले त्याठिकाणी रात्री ९ वा. च्या सुमारास मेहबूब कार घेऊन उभा होता, तरुणी मागील सीट वर बसली असता त्यांनी वसंतराव नाईक कॉलेज जवळ निर्मनुष्य ठिकाणी थांबून तीच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली .
या घटनेचा महिला आघाडी व भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे आज दिनांक ३१ डिसेंबर टॉवर चौक येथे आमदार सुरेश भोळे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर भारतीताई सोनवणे , महिला प्रदेशउपाध्यक्ष उज्वला बेंडाळे,भाजपा सरचिटणीस महेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितित भव्य निषेध दर्शविण्यात आला व मेहबूब शेखच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून निषेधार्थ घोषणा व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी महिला महानगराध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे,नगरसेवक सिंधूताई कोल्हे, पार्वताताई भिल, प्रियाताई जोहरे, शरिफाताई तडवी, युवामोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, युवमोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर राहुल मिस्त्री, रियाझ शेख,गणेश महाजन,स्वामी पोतदार युवा मोर्चा चिटणीस सागर जाधव, जयंत चव्हाण,तेजस भोळे,सकीब शेख आदि उपस्थित होते.