
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३५ लाख खर्चून बांधले स्वच्छता गृह पण जायला रस्ताच नाही
जळगाव — स्वच्छ भारत अभियानांतर्गत मेहरूण येथे ३५ लाखा रूपयांचा निधी खर्च करून या ठिकाणी स्वच्छता गृह बनवण्यात आले, पण या शौचालयात जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्याने येथील नागरिक हे खुल्यावर शौचास बसत आहेत. व शौचालयाची नियमित स्वच्छता केली जात नाही तेथे जवळच असलेल्या नाल्यात ही प्रचंड कचरा पडलेला होता हि बाब आज मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी मेहरूण परिसराला आज भेट देण्यासाठी आले असतां नगरसेवक प्रशांत नाईक व गणेश सोनवणे यानी आज प्रत्यक्षात निदर्शनास आणून दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत चौदाव्या वित्त आयोगातून ५० टक्के निधी हा राखीव असून त्यातून नागरिकांना शौचालयात येण्या-जाण्यासाठी रस्ता बनवून द्यावा अशी मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांकडे यावेळी केली, असता आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की शौचालयाला रस्ता बनवण्यासाठीचे हे काम या निधी मध्ये बसत नाही.