
सुप्रीम कॉलनी वासियांना मिळणार मुबलक पाणी, अनेक वर्षांपासून करावा लागतोय टंचाईचा सामना ; काम अंतीम टप्प्यात..
जळगाव — शहरातील महत्वाचा परिसर असलेल्या सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना आजवर नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत नवीन जलकुंभ आणि पाण्याची टाकी तयार करण्यात येत असून पंप
हाऊसचे काम अंतीम टप्प्यात आहे.दीड महिन्यात काम पूर्ण होऊन नागरिकांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा होणार आहे.शनिवारी महापौर सौ.भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी,स्थायी समिती सभापती राजेंद्रेभाऊ घुगे-पाटील, पाणी पुरवठा सभापती अमित काळे,महिला बालकल्याण सभापती सौ.रंजना सपकाळे, समाजसेवक भरत सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, निता सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, सुरेश भापसे, दिलीप सोनवणे, संजय विसपुते, वाहिद खान, आदिल शाह, चंदू भापसे यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.