स्री-पूरुष विचाराची पेरणी शिक्षणातून होणे गरजेचे- प्रा.शिवाजी गायकवाड…..!

 

आकाश ठाकूर—/

 

स्री-पूरुष विचाराची पेरणी शिक्षणातून होणे गरजेचे- प्रा.शिवाजी गायकवाड

 

 

मिटमिटा येथिल म.न.पा. शाळेत महीला शिक्षक दिन साजरा.

 

प्रतिनीधी पडेगाव,मिटमिटा

 

येथिल मातोश्री प्रतिष्ठाणच्या वतिने महानगर पालीका शाळा येथे आज सावित्रीबाई फूले जयंतीनिमित्ताने महीला शिक्षक दिनी महीला शिक्षकांचा सत्कार तूळसाई मूळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी क्रांतीजोति सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पूजन हार घालून करण्यात आले.मुख्याध्यापिका श्रीमती आर.सी हिवाळे,मातोश्री तुळसाई मुळे, शालेय समिती अध्यक्ष श्री लक्षमण बनकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर मातोश्री प्रतिष्ठाण संस्थेचे अध्यक्ष अँड.अशोक मूळे, संस्था सचिव शिवाजी गायकवाड यांनी “सावित्रीबाई फूले यांचेजीवन शिक्षणकार्य ,सामाजिक आणि समता ” या विषयावर व्याख्यान दिले .शिक्षण आणि सामाजिक समतेच्या विचार आणि कृतितून नवसमाज घडेल.

 

स्त्री – पूरुष समन्वयातून समाजातिल कूलूषित विचार हद्दपार होने गरजेचे आहे .स्र्यांनाही पूरुषांप्रमाने समान पातळीवर सन्मानाने जगता आले पाहीजे असा विचाराची पेरणी शिक्षणातून झाली पाहीजे असे प्रतिपादन केले .या कार्यक्रमाला शालेय समितीचे सदस्य बबनराव मूळे,दशरथ मूळे,राजेश जाधव,तडवीसर यांची प्रमूख उपस्थिती होती. शिक्षक सूभाष पंडीतसर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले तर शिक्षक डी.डी.,देवरेसर, यांनी आभार प्रदर्शन केले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button

Website Design By Bootalpha.com +91 84482 65129

Close